सोलापूर : सो. स. क्षत्रिय समाज (वि. मं.) ट्रस्ट, सोलापूर संचालित सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणेशोत्सवाची सांगता भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात झाली. गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त शालेय परिसरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विसर्जन सोहळ्यापूर्वी सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल व विद्याताई गजाननसा गोयल यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा भुमकर, संस्थेचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे, संस्थेचे सदस्य श्रीरामसा पवार, सुरेशसा बिद्री, गणेशसा दामजी, शिरीषसा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सदस्य अनिलसा रंगरेज, प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार आदी उपस्थित होते.
प्रशालेतील सहशिक्षक देशभूषण खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने आकर्षक व शिस्तबद्ध सादरीकरण करत भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला. लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कसरतींमुळे मिरवणुकीचे विशेष आकर्षण वाढले. ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण शालेय परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
या भव्य मिरवणुकीत संकुलातील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. अखेर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
—
Post Views: 33