सांगोला – तालुक्यातील वाकी-घेरडी रस्त्यानजिक असलेल्या वस्तीवर अंकुश कोळेकर यांचे राहते छप्पर आहे. गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत ते पूर्णतः जळून भस्मसात झाले. यात त्यांची एक जर्सी गायही मरण पावली. पूर्णपणे उघड्यावर आलेल्या या कुटुंबाची माहिती मिळाल्यानंतर सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना शनिवारी सकाळी मदत पोहोच करण्यात आली.
यामध्ये संसारोपयोगी भांडी, चादरी, सतरंजी, टॉवेल तसेच एक महिना पुरेल इतका किराणा माल देण्यात आला. याशिवाय शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक वस्तूंचेही वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सदस्य डॉ.मच्छिंद्र सोनलकर, प्रा.बाळासाहेब वाघमारे, अमर कुलकर्णी, अरविंद डोंबे व घेरडी येथील रमेश अवताडे उपस्थित होते. संकटाच्या काळात गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आपुलकी प्रतिष्ठान सातत्याने करत आहे.
Post Views: 7