निवघा बा हदगाव तालुक्यातील निवघा बा येथे एका दुचाकी स्वराला लुटले त्या बॅगमध्ये अंदाजे दोन लाख 75 हजार रुपये होते.. याबाबत पोलिसांकडून माहिती समोर आली की भारत फायनान्सचे दोन वसुली प्रतिनिधी संतोष जाधव आणि सुदर्शन सोळंके हे आपली दर आठवड्याची मीटिंग आटपून हदगाव कडे जाण्यासाठी रवाना झाले असता निवघा बाजार येथून जवळच असलेल्या शंकर-पार्वती मंगल कार्यालयाच्या थोड्याच अंतरावर सदरील घटना घडली
हे दोघे जात असताना समोरून एक दुचाकीआली त्या दुचाकीवर दोघे बसले होतेआणि भारत फायनान्स वसुली प्रतिनिधी दुचाकी वर बसुन जात असताना त्यातील एकाने त्या वसुली प्रतिनिधी ला दगड मारला आणि दुचाकी बाजूच्या असलेल्या शेतामध्ये जाऊन पडली त्यांच्यामध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली धक्काबुखी होत असताना त्या चोरट्याने चाकू काढला आणि त्या अधिकाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळची बॅग घेऊन ते चोरटे पसार झाले
त्यांच्या धक्काबुकीमध्ये कंपनीचा प्रतिनिधीजखमी झाला त्यांच्या पुढील उपचाराकरिता हादगाव येथे त्यांना रवाना करण्यात आले सदरील घटनेची माहिती मिळताच हदगाव येथील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाली आणि सदरील घटनेचा तपास चालू आहे सदरील घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे