Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट मध्ये तिनही नगर पालिकेत भाजप विरुद्ध सर्व पक्षाची आघाडी ?

तरुण भारतbyतरुण भारत
November 2, 2025
in political
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी अक्कलकोट, मैंदर्गी आणि दूधनी या नगर पालिकेचे निवडणूक जिल्हा परिषद आधी होणार असल्याचे अंदाज गृहीत धरून सर्व राजकीय पक्षाची जोरदार मोर्चा बांधणी सुरू आहे.भाजप मात्र या तिनही नगर पालिकेत ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे.  शिंदेसेने सोबत काँग्रेसचे सूत जुळले की, काँग्रेस पक्ष, दोनही शिवसेना पक्ष आणि दोनही राष्ट्रवादी पक्ष, वंचितसह विविध छोटा मोठे पक्षांकडून मुठ बांधून भाजप विरुद्ध  आघाडी तयार करण्याची जोरदार हालचाली सुरू आहे.या मुळे शहर व तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाला आहे.

      अलीकडची अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठे नुकसान राज्याच्या ग्रामीण भागात असल्याने सोलापूर जिल्हा परिषद, अक्कलकोट पंचायत समित्या निवडणूक लगेच घेण्यासारखी स्थिती नाही. म्हणूनच आयोगाने आधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्याय ठेवला आहे. प्रशासन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी मतदार याद्या, आरक्षण निश्चिती आदी प्रकारची पूर्वतयारी करीत आहे. नगर पालिका आणि जिल्हा परिषदांची एकाच वेळी निवडणूक घेण्यावर आयोगाने भर दिला आहे. 

निकाल एकत्र की वेगवेगळे? या बाबत निर्णय जाहीर झाले नाही.नगरपालिका निवडणुका आधी झाल्या तर त्याचे निकाल मतदानानंतर दोन दिवसांनी मतमोजणी करून लावायचे की जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांनंतर एकत्रितपणे निकाल जाहीर करायचे?  आधी झालेल्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर केला तर त्याचा परिणाम नंतरच्या निवडणुकांवर होऊ शकतो. असा आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग यादृष्टीने काय निर्णय घेते ?  याबाबत उत्सुकता निर्माण झाला आहे.

   तालुक्यात शिंदेसेनेसोबत काँग्रेसचे सूत जुळले की, काँग्रेस पक्ष, दोनही शिवसेना पक्ष आणि दोनही राष्ट्रवादी पक्ष, वंचितसह विविध छोटा मोठे पक्षांकडून भाजप विरुद्ध आघाडी होण्याचे शक्यता आहे.विविध पक्षांच्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून बैठका सध्या सुरू असून वरिष्ठ नेते हे नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे सांगत आहेत. आधी जिल्हा परिषद निवडणूक होणार नसून नगरपालिका निवडणूक होणार असल्यांची अंदाज राजकीय पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे.आयोगाने मात्र अजूनही नगरपालिका आधी की जिल्हा परिषद आधी किंवा दोन्ही एकत्रित याचा निर्णय केलेला नाही. मात्र, त्यासाठीची चाचपणी सुरू झाली आहे. 

      नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकी नंतर किंवा नगर पालिका. सोबत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि शेवटी जानेवारी २०२६ अखेर महापालिकांची निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

  अक्कलकोट नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. मात्र भाजप विरोधी पक्षातील सर्व नेत्याने आघाडी करून तगडा उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याची चर्चा रंगत आहे.            

    दुधनी  येथील नगरपालिकेचे नगराध्यक्षपद (खुले) सर्वसाधारण झाले आहे. यामुळे चुरस वाढली आहे. शिंदेसेनेकडून उमेदवार निश्चित झाला आहे, तर भाजपकडून चाचपणी सुरू  आहे. काँग्रेस पक्ष दोघांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत म्हेत्रे कुटुंबासाठी अस्तित्त्वाची, तर भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.  

      मैंदर्गी शहरावर नेहमी स्थानिक गटाचे वर्चस्व राहिले आहे. खालची व वरची गल्ली या दोन गटांमध्ये निवडणुका होत होत्या. यंदा मैंदर्गी नगर पालिकेत भाजपाने ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत आहेत.माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेसमध्ये असताना एकदाही स्थानिक निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नव्हता. यावेळेस पण स्थानिक गटा सोबत राहणार असल्याची चर्चा आहे.यामुळे दोनही स्थानिक गटसह भाजप विरोधी राजकीय पक्ष एकत्रित येऊन भाजप विरोध निवडणुका लढण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला झाले आहे. उपनगराध्यक्षपदाच्या तयारीचीही लगबग सुरु आहे.

Post Views: 55
Previous Post

महापालिकेच्या बस स्टॉपमध्ये पडलेले भगदाड बुजविले

Next Post

सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात बंडखोरी करणाऱ्या रमेश बारसकर, धनंजय डिकोळे आणि महेश साठेंची माघार

June 4, 2026

पालकमंत्री गोरे म्हणाले मी एकटा बस आहे लावा ताकत #solapurnews #viral

June 4, 2026

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893256

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697