अक्कलकोट – तालुक्यातील नागनाथ प्रशाला कुरनूर येथील सन १९९१-९२ च्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३४ वर्षांनी स्नेह मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. प्रथमत: गुलाब पुष्पांच्या पाकळ्या अंथरलेल्या गालीच्या वरून मुख्य प्रवेश द्वारावर प्रवेश करताना सर्व माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त शिक्षकावर पुष्पांजली वाहत जोरदार स्वागत करण्यात आले.
तदनंतर विद्यादेवता सरस्वती प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्या. महादेव माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक महादेव माने, हरिदास जाजनुरे, शरणप्पा ढोणसाले, परशुराम बेडगे, मदार शेख, सुरेश माने, स्वामीराव सुरवसे, किसन कांबळे, शहाजी गायकवाड आदी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांकडून स्नेहपूर्वक सन्मान करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आबा महाराज कुरनूरकर, कार्तिक पाटील, उस्मान मुजावर आदी विद्यार्थ्यांनी गुरुप्रति असलेला आदर मनोगतातून व्यक्त केला. यावेळी तब्बल ३४ वर्षानंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना पुन्हा शाळेचा अनुभव आल्याने कंठ दाटून आला होता.
कार्यक्रमानंतर दुपारी विद्यार्थी व शिक्षकांनी स्नेहभोजन केले.
यावेळी राजेंद्र मोरे ,मेजर रामचंद्र शिंदे, भास्कर मोरे तसेच मधुकर बनसोडे, विठ्ठल सपकाळ, महादेव पाटील, बाबासाहेब शिंदे, गणेश पाटील ,हेमंत पवार , पोपट गायकवाड, तानाजी मोरे, मीनाक्षी मोरे ,अनुराधा शिंदे, चिमुताई इंडे,बेबा साखरे, हिरालाल मुजावर, विकास येवते, गोविंद पाटील, राजकुमार पाटील, रफिक शेख आदि उपस्थित होते.
सूत्रसंचालन दिगंबर जगताप तर कार्तिक पाटील यांनी आभार मानले.

























