सोलापूर – एन. टी .आर अभिमान संघम आणि तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंध्र प्रदेश मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त तेलुगु भाषा वाचन व लेखन प्रशिक्षण वर्गास सुरुवात करण्यात आली. प्रथम तेलुगु तल्ली प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर नारा चंद्रबाबू नायडू यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक तथा स्थापत्य विभाग सदस्य विजय चिप्पा यांनी आपल्या मनोगतात तेलुगु भाषा शिकणे गरजेचे असून आंध्र प्रदेश व तेलंगाना येथे गेले असता आपल्याला त्याचा उपयोग होतो असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना करताना ग्रंथालयमचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटम यांनी गेल्या पन्नास वर्षापासून तेलुगु भाषा वाचन व लेखन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे असे सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थायी समिती सदस्य व नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात आपल्याला तेलुगु भाषा वाचता लिहिता येणे आवश्यक आहे, यामुळे आपल्याला तेलुगु साहित्य कळते, असे मत व्यक्त केले. यावेळी शिक्षिका राजलक्ष्मी गुडूर यांनी तेलुगु भाषा प्रशिक्षणाला सुरुवात केली.
सदरच्या कार्यक्रमाला ग्रंथालयमचे सचिव तिपण्णा गणेरी, कार्याध्यक्ष बालराज बोल्ली ,उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदूल ,सदस्य संजीव नादरगी, शंकर चौगुले, नरसिंहम कनकी ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर, मोहन सामलेटी,अॅड श्रीनिवास क्यातम ,जनार्दन इंजामुरी, किसन आडम, शंकर द्यावरकोंडा, श्रीनिवास गणेरी, साईकुमार अलवाल, वेणुगोपाल म्याना ,ईरण्णा भंडारी, श्रीनिवास नंदाल,तिमप्पा गडगी, रायलिंग मिठ्ठापल्ली, बाळकृष्ण आंबट, पुरुषोत्तम बुधारम व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवियत्री रेणुका बुधारम यांनी केले तर आभार प्रदर्शन कवी प्रा.नरेंद्र गुंडेली यांनी मानले.तसेच २०/०४/२०२६ ते २५/०५/२०२६ पर्यंत चालणाऱ्या या तेलुगु प्रशिक्षण वर्गात नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सचिव तिपण्णा गणेरी यांनी केले आहे.


























