
मोडनिंब – (ता.माढा) येथील भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या संघटनात्मक घोषणेनुसार मोडनिंब शहर मंडल अध्यक्ष पदी अनिकेत बाळासाहेब गुरव यांची तर उपाध्यक्ष पदी अमोल सरडे यांची निवड झाली.भाजपा नेते रणजित शिंदे यांच्या हस्ते, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रणवीर राजेंद्र राऊत यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या अंत्योदय व कल्याणकारी विचारांना युवकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवकांनी जोमाने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.या प्रसंगी प्रशांत पाटील, शहाजी माळी, विशाल मोरे,सूरज सुर्वे,केशव माने,शंभू सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर वैभव मोरे, कैलास तोडकरी, बंटी पवार, अथर्व इलेक्ट्रिकल्सचे रोहित गडेकर,श्रीप्रभा उद्योग समूहाचे प्रणय सुर्वे, गणेश महामुनी यांनी अभिनंदन केले.सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.























