सोलापूर – “बाल कामगार विरोधी दिन “महात्मा फुले समाज सेवा मंडळ,करमाळा यांच्या वतीने सोलापूर येथील रेल्वे स्टेशन मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सोलापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर श्रीवास्तव हे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे पोलीस एपीआय श्री. यादव साहेब तसेच एडवोकेट किनीकर मॅडम उपस्थित होत्या.श्री यादव यांनी आपल्या भाषणात बालकामगार विषयी माहिती सांगून बालकामगार कामावर ठेवल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते ?व कोणाला शिक्षा होते ?किती शिक्षा होते?याचे स्पष्टीकरण केले.महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने जिल्हा समन्वयक सौ. रजनीगंधा गायकवाड यांनी पाहुण्यांचे बुके देऊन स्वागत केले सौ. रजनीगंधा यांनी आपल्या भाषणामध्ये “बाल कामगारांची सद्यस्थिती काय आहे ?बालकामगार ही संकल्पना कशी चुकीची आहे ?या संकल्पने पाठीमागे पालकांचे, समाजाचे आणि रूढी परंपरेने चालत आलेली कारणे कोणती? मुलांचे हक्क व त्यांचे बालपण जपणे व त्यांना कामाच्या ओझ्यातून मुक्त करून शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणणे गरजेचे आहे
कार्यक्रमाची प्रस्तावना वामन बावळे यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सो. सुजाता कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशन वरील प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर”बालकामगार विरोधी दिन”यांची प्रार्थना सुजाता कांबळे यांनी म्हटली.
Post Views: 12