टेंभुर्णी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महसूल विभागातील सहाय्यक अधिकारीपदी अनुजा सावळाराम खटके-पाटील यांची निवड झाल्याबद्दल तांबवे (टे.) येथे ग्रामस्थांतर्फे स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे होते. प्रास्ताविक व मनोगताद्वारे माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश खटके-पाटील यांनी अनुजा यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विक्रमदादा शिंदे, बंडू नाना ढवळे, सागर ढवळे आदींनी मनोगत व्यक्त करून अनुजा यांच्या यशाचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना अनुजा खटके-पाटील यांनी आपल्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच खटके-पाटील कुटुंबीय, ग्रामस्थ व शुभेच्छुकांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमास माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे, हरिदास मरकड, सागर ढवळे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक ब्रह्मदेव मरके, संजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, माजी सरपंच सागर ढवळे, तांबवे येथील नेते नागनाथ खटके, डॉ. भीमराव पवार, कल्याण अनपट, दत्तात्रय ढवळे, संग्राम देशमुख, नानासाहेब ढवळे यांच्यासह शेतकरी, तरुण मित्र, माता-भगिनी, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
अनुजा खटके-पाटील यांच्या यशाबद्दल कुटुंबीय व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून त्यांच्या भावी प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी केले, तर विजय खटके यांनी मानले.
Post Views: 15