सोलापूर – सिद्धेश्वर फाउंडेशन आणि जामगुंडी परिवाराच्या वतीने जुळे सोलापूर येथील जामगुंडी मंगल कार्यालय (जामगुंडी लॉन्स) येथे भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ (भागवत सप्ताह) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आनंदशास्त्री मुळे गोंदीकर महाराजांनी जुळे सोलापूर मध्ये जामगुंडी मंगल कार्यालयात भागवत सप्ताह चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आणि समर्थ रामदास अणि शिवाजी महाराज यांची उभ्या आयुष्यात कधीच भेट झाली नसताना आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा तसा आदेश असतानाही अनंत शास्त्री मुळे गोंदीकर महाराज यांनी त्यांची भेट झाली आणि शिवाजी महाराजांनी समर्थांची माफी मागितली असे उद्गार काढले होते. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जामगुंडी मंगल कार्यासमोर अनंत शास्त्री मुळे गोंदकर या कीर्तनकार च्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे संबंधित आयोजकांनी दिलगिरी व्यक्त करून अनंत शास्त्री मुळे महाराज यांनी चालू कार्यक्रमात तमाम शिवभक्ताची माफी मागितली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















