सोलापूर – इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सामुदायिक विवाह सोहळयामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नव विवाहित दांपत्यासाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत सोलापूर जिल्हयातील सामुहीक विवाह सोहळयामध्ये विवाह केलेल्या दांपत्याना तसेच विवाह संपन्न केलेल्या संस्थेस कन्यादान योजनेतंर्गत शासन निर्णय दि.2 फेब्रुवारी 2019 मधील अटी व शर्तीनुसार तसेच शासन निर्णय 18 जुलै 2024 मधील वाढीव अनुदान रक्कम रुपये 25,000/-डिबीटी पध्दतीने लाभार्थ्यांच्या खात्यावर अदा करण्यात येते. तसेच सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थेस प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रति दांपत्य रक्कम रुपये 4000/- इतके अदा करण्यात येते.
सदर योजनेबद्दलचे निकष हे 2 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट अ, ब, क, ड नुसार असतील प्रस्तावाचा नमुना हमीपत्र व प्रतिज्ञापत्र इत्यादी बाबीकरीता खालील नमुद पत्यावर कार्यालयास संपर्क साधावा. पत्ता – सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय चौथा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सात रस्ता सोलापूर. अशी माहिती सहायक संचालक इ.मा.बहुजन कल्याण, गणेश सोनटक्के यांनी दिली आहे.























