माढा : विठ्ठल प्रतिष्ठान, निमगाव (टे.) संचलित आर्या पब्लिक स्कूल, माढा या सीबीएसई संलग्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षा उत्कृष्ट यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास, स्पर्धात्मक वृत्तीची जोपासना आणि विविध स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी या उद्देशाने घेण्यात आलेल्या या परीक्षेत श्लोक अमोल नाईकवाडे यास शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तसेच आराध्या परीक्षित कांबळे व शौर्य महादेव गायकवाड यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना इंडियन टॅलेंट परीक्षेचे विभागप्रमुख जयदेव गायकवाड यांच्यासह दत्तात्रय चव्हाण, मनोज नागटिळक, रोहित भांगे, अतुल लंकेश्वर, शुभम पुरवत, वंदना गोसावी, संध्या सरडे,उज्वला हिप्परगी, सारिका यादव, प्रतिभा आलदर, प्रतीक्षा पाटील, प्रियंका काशीद, रागिनी शिंदे, स्नेहल कदम व शुभांगी वास्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार बबनरावजी शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई शिंदे, शाळेचे प्राचार्य सागर थोरात, कार्यालयीन अधीक्षक संभाजी पाटील,अरुण माने व तुषार तोडकरी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.