सोलापूर – महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच हेरिटेज समूह, चॅम्प चेस स्कूल आणि नेक्स्ट मुव्ह चॅम्पियन ऑनलाइन चेस अकॅडमी यांच्या सहकार्याने सोलापूर चेस अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “चॅम्पियन चषक” १३ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू नागपुरचा मरस सिंग, कुशाग्र पालीवाल यांनी पाचव्या फेरीअखेर पाच गुणासह संयुक्तरीत्या आघाडी घेत सर्धेत चुरस निर्माण केली आहे. तसेच मुलीच्या गटात मुंबईची त्वेषा जैन हिने पाच गुण मिळवीत आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा अर्ध्या गुणाची आघाडी घेतली आहे. तसेच पुण्याचा लठीक राम व मुंबईचा आरव धायगुडे यांनी मुलांच्या गटात तर सोलापूरची सान्वी गोरे, नाशिकची प्रिशा घोलप व नागपूरची अनुष्का देशपांडे हे प्रत्येकी साडेचार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
गांधीनगर येथील द हेरिटेज येथे आजपासून सुरु झालेल्या सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये पहिल्या पटावर पहिल्या पटावर लठीक राम व आरव ध्यागुडे यांच्यातील लंडन सिस्टीम ने झालेल्या गावात मध्य पर्वत दोघांनी कोणताही धोका न पत्करता २३व्या चालीनंतर डाव बरोबरीत सोडवला. दुसऱ्या पटावर मरास सिंग व कोल्हापूरचा विवान सोनी यांच्यातील प्रदीर्घ व रंगतदार झालेल्या लढतीत सिसिलियन डिफेन्सने रंगलेल्या डावात दोघांनीहि तोडीस तोड चाली रचल्या. परंतु अंतिम पर्वात विवानने केलेल्या चुकीचा अचूक रित्या फायदा घेत अटीतटीच्या या लढतीत ९० व्या चालीनंतर मरासने विजय संपादन करत स्पर्धेत आघाडी घेतली.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रमुख पंच मुंबईचे आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी,तर त्यांना सहायक वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, शशिकांत मक्तेदार, वरिष्ठ राष्टीय पंच रोहिणी तुम्मा, युवराज पोगुल, गणेश मस्कले, जयश्री कोंडा, विजय पंगुडवाले, भरत वडीशेरला, प्रज्वल कोरे, यश इंगळे, अभिजीत बावळे हे काम पाहत आहेत.
*पाचव्या फेरीअखेरचे महत्वाचे निकाल:*
मुली: प्रीशा घोलप वि. वि सर्वा परेलकर, अनुष्का देशपांडे वि. वि. अपूर्वा तिस्या, वेधा बायजू वि. वि. श्रीनिधी भोसले
मुले : निर्वाण शहा वि. वि. अमेय चौधरी, ओम रामगुडे वि. वि. आर्यन करली.
Post Views: 19