अकलूज – शालेय शिक्षणात हस्तकला कौशल्याचा प्रभावी समावेश करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी), संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत जि.प. आदर्श प्राथमिक शाळा आनंदनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील सहशिक्षक संजय पाटे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
देशातील ११ राज्यांमधून ६६ शिक्षक सहभागी झालेल्या या प्रशिक्षणात त्यांनी महाराष्ट्राच्या लोकपरंपरा, हस्तकला व सांस्कृतिक वैशिष्ट्यांची प्रभावी मांडणी केली.
दि.८ ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या ‘शालेय शिक्षणात हस्तकला कौशल्याचा समावेश’ या प्रशिक्षणात संजय पाटे यांनी सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशभरातील शिक्षकांसमोर करून दिली.
प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सीसीआरटीचे अध्यक्ष विनोद इंदूरकर यांच्या हस्ते संजय पाटे यांचा सन्मान करण्यात आला.
यानिमित्ताने संजय पाटे यांना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय अण्णा मदने, केंद्रप्रमुख जावेद मुलाणी, विस्ताराधिकारी सुषमा महामुनी, गटशिक्षणाधिकारी महेश गवळी, शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांचे प्रोत्साहन लाभले.
Post Views: 5