सोलापूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थिनी आयेशा अबिदुल्ला काझी हिने दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. आर्थिक अडचणी असूनही आयेशाने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशामुळे कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व मित्रपरिवाराकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. “प्रतिकूल परिस्थिती असली तरी मेहनत, आत्मविश्वास आणि ध्येयाची जिद्द असेल तर यश नक्की मिळते, ” हे आयेशाने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आयेशाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक गफूर सगरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.


























