सांगोला – सांगोला तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी यांनी दर वर्षी १ एप्रिल ते ३० जुन या कालावधीत हयात असलेबाबत हयात दाखले जमा करणे आवश्यक आहे. परंतु ब-याच लाभार्थी यांनी हयात दाखले जमा केलेले नाहीत. मुदतीत दाखले जमा न केल्यास अनुदान बंद होऊ शकते, तरी हयात दाखले जमा करावेत असे आवाहन सांगोला तहसिलदार बाळुताई भागवत यांनी केले आहे.
दिव्यांग लाभार्थी यांना अनुदान मिळवणेसाठी युडीआयडी बंधनकारक करणेत आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड नाही त्यांनी ३० सप्टेंबर पुर्वी प्राप्त करुन घेऊन तहसील कार्यालयात जमा करावेत. ज्या लाभार्थी यांचे युडीआयडी कार्ड व आधार कार्ड वरील जन्म तारखेत तफावत आढळुन आली आहे अशा लाभार्थ्यांच्या याद्या ग्राम महसुल अधिकारी कार्यालयात प्रसिध्द करणेत आलेल्या आहेत. तरी सदर यादीत नाव असलेल्या लाभार्थी यांनी तहसील कार्यालयात येऊन व्हेरिफिकेशन करुन घ्यावे. तसेच ज्या लाभार्थी यांचे आधार बँक खात्यास लिंक नाही त्यांनी आधार लिंक करुन घ्यावे असे आवाहन तहसिलदार बाळुताई भागवत यांनी केले आहे.
Post Views: 7