बार्शी – श्रावण महिन्याच्यानिमित्ताने येथील श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्यावतीने श्री उत्रेश्वर मंदिर येथे रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ८ या वेळेत सुप्रसिद्ध अभंग आणि भक्तिगीतांच्या ‘भक्तिधारा’ संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्लासच्या संचालिका प्रा. दिपाली सहस्रबुध्दे यांनी दिली.
गेल्या २५ वर्षांपासून विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने ही सेवा श्री उत्रेश्वर चरणी समर्पित केली जात असून यंदाचे हे २६ वे वर्ष आहे. तरी सर्व संगीत रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.