सांगोला – दूरवरून शाळेत ये-जा करणाऱ्या गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, यासाठी आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांच्या वतीने जि.प.प्रा.शाळा दिघेवाडी येथील पाच गरजू विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात आल्या. याचे वितरण सांगोल्यातील गायत्री मार्टचे महादेव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सुरेश चौगुले, अरविंद डोंबे, कैलास कांबळे, दत्तात्रय नवले, चंद्रशेखर कवडे, हणमंत बोत्रे, महालिंग झाडबुके, विकास वाघमारे यांच्यासह मुख्याध्यापिका वैशाली कलूबर्मे, उपशिक्षिका स्वाती घोंगडे, संगीता ठोकळे, शिक्षक नवनाथ साळुंखे उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी कौतुक केले.
चौकट-
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे, त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणे, हा आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा महत्त्वाचा भाग आहे.
-राजेंद्र यादव, अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान