यवतमाळ : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळमधील प्रचारसभेतच भोवळ आली. भाषणाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना भोवळ आल्याचे कळताच त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना मंचावरून बाजूला नेले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळते आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या शिवाजी महाराज ग्राऊंडवर ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. बाकी नेत्यांची भाषणे झाल्यावर गडकरींनी सभेला संबोधित करायला सुरूवात केली. परंतु यवतमाळमध्ये प्रचंड तापामानाचा पारा चढल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सुरू झाला. ऊन सहन न झाल्याने काही मिनिटांतच त्यांना भोवळ आली.
आजच्या दिवसातील नितीन गडकरी यांची दुसरी सभा होती. सकाळच्या सत्रात बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा



















