सोलापूर – बहिणीला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी घरी आलेल्या दोघा मेहुण्यांना मारहाण करून त्यांना घराबाहेर काढल्याप्रकरणी आरोपी भाऊजीसह तिघा जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शोएब गुलाम मोमीन, गुलाम मोमीन आणि फिरोज मुलाणी ( रा. साखर पेठ, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत सरफराज महिबुब शेख (रा. ४८७, नॉर्थ कसबा, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी व भाऊ अबुबकर असे मिळुन दि. १ जुन २०२६ रोजी सायं . ७ वा चे सुमारास, साखर पेठ येथे बहिण अर्शिया हिच्या घरी गेले असता भावजी शोएब मोमीन याने तुम्ही कोण घरी येवून मला सांगणारे ,तुमची बहिण आता माझी बायको आहे, तुमचा काही संबंध नाही असे म्हणून अंगावर धावून येवून घरातील डंबेल्सने फिर्यादी च्या छातीवर मारण्याचा प्रयत्न केला . फिर्यादीने अडविले असता डंबेल्स लागून फिर्यादी च्या हाताला, पाठीवर व फिर्यादीच्या भावाला डोळयाखाली दुखापत झाली. यावेळी इतर दोघा आरोपींनी शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी व त्याच्या भावाला घरा बाहेर काढल्याचे फिर्यादित म्हंटले आहे . पोलीस हवालदार खुणे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 9