सोलापूर : सोलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या सभेत संस्थेच्या पुढील कार्यकाळासाठी चेअरमनपदी सीए विजय रविंद्रनाथ जवळगेकर आणि व्हाईस चेअरमनपदी राजीव रणजित देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे सेक्रेटरी ॲड. विजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी संचालक ॲड. उमेश मराठे, प्रशांत देगांवकर, मयुर करवा आणि मनीष आराध्ये उपस्थित होते.
निवडीनंतर कार्यकारिणीतील सर्व संचालकांनी तसेच संस्थासंचलित विविध विभागांच्या प्राचार्यांनी नूतन चेअरमन सीए विजय जवळगेकर आणि व्हाईस चेअरमन राजीव देसाई यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष रणजितभाई देसाई आणि उपाध्यक्ष डॉ. सतीश परशुरामी यांनीही दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.