मोहोळ (तालुका प्रतिनिधी)मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते छगन अष्टुळ यांची भाजपाच्या अनु जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली…
छगन अष्टूळ हे मागील २५ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत.त्यांनी आजवर अनेक वंचित दुर्बल व्यक्तींना न्याय मिळवून दिला आहे. तसेच शसनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे या त्यांच्य
कार्याची दखल घेवून त्यांची अनु जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही निवड जिल्हा अध्यक्ष बालाजी वाघमारे यांनी केली असून अनु जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या हस्ते शशीकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे यावेळी मुजिब मुजावर उपस्थित होते. त्यांचा निवडी बद्दल माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत तात्या माने, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे,भाजपाचे जिल्हा चिटणीस आणि मोहोळ विधानसभां एसआयआर प्रमुख महेश सोवनी, जिल्हा सदस्य अविनाश पांढरे, प. महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, उत्तरमंडल अध्यक्ष सतीश काळे, सरचिटणीस अरविंद माने,दक्षिण मंडल अध्यक्ष रमेश माने, भारतीय मजदूर संघाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र गाडे – पाटील,शैलेश धोत्रे, आदिंनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 12