सोलापूर: सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलमध्ये अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहामध्ये कविता गायन, शुद्धलेखन, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथावाचन घेण्यात आल्या व आज व्याख्यानाने समारोप करण्यात आला. अभिजात मराठी भाषा या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक,प्राध्यापक श्री.विजय साळवे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. व्याख्यानात मा.श्री विजय साळवे यांनी मराठी भाषेच्या उगमापासून ते अभिजात भाषा दर्जा प्राप्त होईपर्यंत मराठी भाषेचा इतिहास अतिशय साध्या सोप्या रसाळ वाणीमध्ये विद्यार्थ्यांना सांगितले. मराठी भाषेची गोडी वाढावी, मराठी भाषेचा संवर्धन करावा, मराठी भाषेचा अभिमान बाळगावा यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजे हे आपल्या व्याख्यानात सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मराठी भाषेचे महत्त्व आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बगले एस. एम. तर आभार श्री पाटील बी.एस.मानले.
Post Views: 5