सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रास्ताविकेचे) सामूहिक वाचन करण्यात आले.या कार्यक्रमास महानगरपालिका मुख्य लेखा अधिकारी तथा मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने, माळशिरस तालुका ग्रामपंचायत विस्तार अधिकारी स्वप्निल वाघमारे, ठाणे येथील जे. जे. पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉ. गौतम गोसावी , अभिनेते प्रज्योत वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक मल्लिकार्जुन हिरेमठ, लेखापाल महेश वालावलकर, पर्यवेक्षक संतोष बुलबुले, मनीष बांगर, भगवान मुंढे, सुरेश कासार, रजनी राऊळ, तरंगिणी कोंडा, सारंग अंजीखाने, अबरार डोंगरी, अमित लामतुरे, अविनाश शिंदे, रियाज आतार, अमोल गायकवाड, नितीन अंकुश, भगवान गायकवाड, राजेंद्र शिंदे, भालचंद्र साखरे, सायली ढोले आदी उपस्थित होते.
Views: 36