अकलूज – शारदीय नवरात्रौत्सवा निमित्ताने अश्विन शुद्ध पंचमी ते अष्टमी दरम्यान अकलुजची ग्रामदेवता श्री.अकलादेवी मंदीराच्या प्रांगणात देवी महात्म्य ग्रंथ सामुदायिक पारायणाला प्रारंभ झाला असून सुमारे ७०० महिला पारायण करत आहेत.
ग्रामदेवता अकलाई देवी देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्य विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली व विश्वस्त स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलाई देवीच्या प्रांगणात शारदीय नवरात्रौत्सवा निमित्ताने गुरुवार दि.१५ ते सोमवार दि.१९ अक्टोंबर या पाच दिवसा दरम्यान सकाळी ९ ते ११ या वेळेत पुजारी मोहन व मदन क्षिरसागर गुरव यांच्या अधिपत्याखाली देवी महात्म्य ग्रंथ सामुदायिक पारायणचे व्यासपीठ चालक अक्षय उर्फ वैभव गुरव आहेत.अश्विन शुद्ध पंचमीला पारायणास प्रारंभ झाला असुन यंदा सप्तमी दोन दिवस असल्याने अश्विन शुध्द पंचमी ते अष्टमी असे पाच दिवस देवी महात्मा ग्रंथ सामुदायिक पारायण संपन्न होत आहे.या पारायणात अकलुज व परिसरातील ७०० महिला सहभागी होवुन देवी महात्म्य ग्रंथ वाचन करत आहेत.
चौकट
अश्विनशुद्ध पंचमीस पाचव्या माळेला महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे मोहिते पाटील उभयंताच्या हस्ते देवीची महापूजा व आरती करण्यात आली.
Post Views: 11