टेंभुर्णी- राष्ट्रवादी युवक काॅग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नाना-भैय्या युवा मंचाच्या वतीने गोविंद वृध्दाश्रम येथे धान्य व फळ वाटप करण्यात आले.
सुरज देशमुख यांनी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित समाजाचे हित जोपसले आहे. त्यांचे विचार आणि आदर्श डोळ्यासमोर आमच्या मित्रपरिवाराने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमातील लोकांसाठी गहू,तांदूळ तसेच फळे वाटप करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाबद्दल वृध्दाश्रमातील लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी सोमनाथ कदम,गणेश केचे,यशपाल लोंढे,नामदेव खुळे,माणिक कदम,सुरेश देशमुख,प्रताप देशमुख,अशोक वाघमारे,बापूसाहेब शिंदे,बाळासाहेब देशमुख,ग्रा.प.सदस्य शैलेश ओहोळ,वैभव महाडिक-देशमुख,अप्पा हवलदार,प्रशांत देशमुख,लखन माने,बिटू केचे,शारंग गायकवाड,विशाल मस्के,शरद इंगळे,नाना भोसले,आकाश सुतार,अशोक कांबळे,अदित्य देवकर,बालाजी महाडिक,आकाश पिसाळ,प्रथमेश थोरात उपस्थित होते.आभार दशरथ देशमुख यांनी मानले.
Post Views: 6