अधिक मासानिमित्त मंगळवेढा शहरातील प्रमुख मार्गावरून पहाटे अभंग,भजने म्हणत नगर प्रदक्षिणा घालणार्या दोन्ही प्रभात दिंडयातील वारकर्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
तीन वर्षातून एकदा येणार्या अधिक मासा (धोंडा महिना) निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथून संपूर्ण एक महिना पहाटे 5 वाजता एकतारी भजनी मंडळाची मंगळवेढा शहरास नगरप्रदक्षिणा पूर्ण करीत दिंडी काढली जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गायलेल्या विविध संतचरणाचे गायन दिंडीमध्ये केले जाते. तसेच शनिवार पेठ येथील गोविंदबुवा मंदिर येथून मंगळवेढा शहरास पहाटे पाच वाजता एक महिना नगरप्रदक्षिणा केली जाते.
यावेळी आयुर्वेदाभ्यासक,सेवानिवृत्त कृषी अधिकारी रत्नाकर वेदपाठक,दत्तात्रय घोडके,अस्विन गायकवाड,सुनिल भगरे,महेश चव्हाण,सागर देशमाने, सखाराम जाधव,पप्पू कोताळे,गोपाळराव भगरे,बागवान उपस्थित होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चोखामेळा चौकात हा कार्यक्रम संपन्न झाला.
ओळी – अधिक महिन्यानिमित्त निघणार्या प्रभात दिंडयातील वारकर्यांना अल्पोपहाराचे वाटप करताना उपस्थित मान्यवर (छाया-प्रथमेश वेदपाठक,मंगळवेढा.)





















