डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु आहे. या घटनेत ६० हून अधिक जण जखमी असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाचे हादरे दोन ते किलोमीटरच्या परिसरात बसले होते. त्यामुळे या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर लांबच्या अंतरावर फेकले केले होते. आजूबाजूच्या परिसरात धूर पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.