माढा – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, जागतिक शांती परिषद व भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित २०२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा कर्मवीर भाऊराव पाटील सन्मानाचा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. दत्तात्रय काळेल यांना नुकताच पुणे येथील पत्रकार भवन मध्ये देण्यात आला. या मानवाधिकार परिषदेमध्ये नागपूर विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. एस. एन.पठाण साहेब यांच्या हस्ते व मा. अशोक कुमार पगारिया, संस्थापक अध्यक्ष, प्रीतम प्रकाश महाविद्यालय, पुणे व प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर तसेच डॉ.संजय कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ व आयोजक प्रो. डॉ. गोरख साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांचे ग्रामीण भागातून व शैक्षणिक संस्थेमधून सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल मा. संजीव पाटील, चेअरमन, महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य डॉ. घन:शाम हराळे, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.