सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये भारतीय घटनेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनअधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनपा प्राथमिक मंडळाचे मुख्य लिपिक माहेजबीन शेख, लेखापाल मल्लिकार्जुन हिरेमठ, संतोष बांगर, संतोष बुलबुले, सुरेश कासार, रजनी राऊळ, निलोफर सय्यद, तरंगिणी कोंडा, महेश वालावलकर, सारंग अंजीखाने, तुकाराम भोसले, अविनाश शिंदे, सचिन जाधवर, आनंद हिरेमठ, सतिश सरवदे भालचंद्र साखरे सचिन साखरे सायली ढोले आदी उपस्थित होते.
























