Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे जीवनकार्य  भारतीयत्व टिकवण्यासाठी

तरुण भारतbyतरुण भारत
March 8, 2026
in soalpur
0
डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे जीवनकार्य  भारतीयत्व टिकवण्यासाठी
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – देशाचे मूळ असलेल्या संस्कृतीपासून भारताला विलग करण्याचे प्रयत्न होत असताना डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे जीवनकार्य मात्र भारताचे भारतीयत्व अखंडपणे टिकवण्यासाठी होते, असे प्रतिपादन तीर्थक्षेत्र अयोध्याचे  कोषाध्यक्ष आणि ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.

ज्ञानप्रबोधिनीच्या राष्ट्रसमर्पित जेष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्यावरील आठवणींचा संग्रह असलेल्या स्वर्णस्मृतिदले या स्मृतिग्रंथाचे आणि डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी लिहलेल्या स्वामी रंगनाथानंदजी यांच्या चरित्राचे प्रकाशन शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर ज्ञानप्रबोधिनीचे कार्याध्यक्ष गिरीश बापट, कार्यवाह सुवर्णा गोखले, सहकार्यवाह अमोल गांगजी, हराळी केंद्राचे प्रमुख अभिजीत कापरे उपस्थित होते.

ज्ञानप्रबोधिनीच्या राष्ट्रसमर्पित जेष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे मार्च २०२५ मध्ये निधन झाले. त्यांच्यावर समाजातील १२५ मान्यवरांनी लिहलेल्या आठवणींचे संकलन या स्मृतीग्रंथात करण्यात आले आहे.

प्रारंभी  ‘ध्येयाचा सुगंध’ ही डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. यात डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग नाट्य स्वरूपात सोलापूरकरांसमोर सादर करण्यात आले. यात ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला. या नाटिका सादरणीकरणाला सोलापूरकरांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, साधना, संतसंगती, स्वाध्याय, आत्मचिंतन हा डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचा स्थायीभाव होता. त्यांचे जीवन तपस्विनी आणि वीरांगनेचे होते. साधक आणि योद्धा यांचे कार्यक्षेत्र जरी वेगळे असले तरी त्यांची उर्मी सारखीच असते. डॉ. भिशीकर यांचा आदर्श घेऊन काम करण्याचे उदाहरण पुढील पिढीला देण्याकरिता हा स्मृतीग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. समाजाकडून मला काहीही नको. मला केवळ समाजाची सेवा करायची आहे, असा भाव असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा प्रभाव त्यांच्यावर होता. प्रसिद्धीचा हव्यास सोडून समाज उन्नतीचा ध्यास घेतलेल्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी आयुष्यभर शिवभावे जीवसेवा केली असे गौरवोद्गारही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी काढले. ज्ञानप्रबोधिनीचे कार्याध्यक्ष गिरीश बापट यांनी यावेळी काढले.

ज्ञानप्रबोधिनीचे सहकार्यवाह अमोल गांगजी यांनी परिचय करून दिला. ज्ञानप्रबोधिनीच्या डॉ. अपर्णा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सोलापूरकरांनी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रचंड गर्दी केली होती.

 

निस्वार्थ सेवाच खरी साधना; समाजकार्य करताना संयम व समर्पण आवश्यक

समाजासाठी काम करताना अनेक प्रसंगी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. कधी अशा लोकांकडेही वारंवार जावे लागते, ज्यांच्याकडे जाण्याची इच्छा सुद्धा मनात नसते. परंतु समाजहिताचा विचार मनात ठेऊन हे सर्व सहन करणे आणि कर्तव्य म्हणून ते पार पाडणे, हीच खरी साधना असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले.

Views: 126
Previous Post

खासदार डॉ ज्योती वाघमारे यांचे सोलापुरात जंगी स्वागत.. #public #maharashtranews #viral #mh13 #news

Next Post

धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवले; संपूर्ण परिसर झाला ‘भोंगेमुक्त’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवले; संपूर्ण परिसर झाला ‘भोंगेमुक्त’

धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवले; संपूर्ण परिसर झाला ‘भोंगेमुक्त’

ताज्या बातम्या

सोलापूर शहर मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार राजेंद्र मदने

November 7, 2026

सोलापुरात दोन मार्गांवर मोफत बससेवा सुरू!

November 7, 2026

#brekingnews #bjp #congress #viralvideo #solapurnews #maharashtra

November 7, 2026

#breakingnews #solapurnews #viralvideo #maharashtranews

November 7, 2026

सोलापुरात भाजपची लोकशाही वाचवा नव्हे, गुंडगिरी वाढवा!

November 7, 2026

महानगरपालिकेत अग्निशमन दलाच्या आपत्ती व्यवस्थापन स्पेशल बाईक दाखल

November 7, 2026

#breakingnews #viralshorts #solapur #solapurmahanagarpalika

November 7, 2026

चार महिने उलटले, इलेक्ट्रिक बससेवा अजूनही बंदच!

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1474848

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!