पिलीव – माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे जात असताना ड्रायव्हरचा छोटा हत्तीवरील (एम .एच 13 डी क्यु 6335) विहीरीत पडुन सोळापैकी आठ जणांचा मृत्यु झाला .हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे असल्याचे समजते.मृत्युमुखी पडलेल्या इंदुबाई बावचे वय 60,पुजा सातोरे वय 23,पुजा बावचे वय 27 वर्ष,ध आश्विनी बावचे 27 वर्ष, संस्कार बावचे 14 वर्ष, संसकृती बावचे 14 वर्ष, अरुण खातोरे वय 8 वर्ष व समर्थ बावचे वय 6 महीने हे जागीच मयत झाले .तर सिद्धेश्वर जाधव, सागर चौगुले, शशिकांत जाधव, बालाजी बावचे, गणेश बावचे, संदीप बावचे, ताई बावचे ह्या गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतदेह पंढरपूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पंढरपूर येथे पाठविण्यात आले आहेत. सध्या अधीक महीना सुरु असुन म्हसवड येथे देवदर्शनानंतर घराकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी माजी आमदार रामभाऊ सातपुते, सांगोलयाचे आमदार बाळासाहेब देशमुख, माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी भेट दिली. फोटो _ (1) विहीर (2) छोटा हत्ती
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















