वळसंग – (ता.द. सोलापूर) शासनातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच एन एम एम एस परीक्षेस श्री शंकरलिंग प्रशालेतील इयत्ता आठवीमधील एकूण ३३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यांपैकी २३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेस घवघवीत यश मिळवून दिले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी कुमारी साक्षी मल्लिकार्जुन भैरामडगी ही सदरच्या एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीसाठी पात्र झाली आहे.या यशस्वी विद्यार्थिनीस शासनातर्फे दर वर्षाला ₹१२००० प्रमाणे पाच वर्षांकरिता सदर शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशस्वी विद्यार्थिनीस संजयकुमार धनशेट्टी, विजयालक्ष्मी थळंगे, सिध्दाराम भैरामडगी, श्रीमंत भोसले, बसवराज दुधगी,सिद्धारूढ हिरेमठ,स्नेहा हळगोदे, गंगाधर बिराजदार, विजय प्याटी, शिवराज अष्टगी,मल्लिनाथ गौडगाव यांच्यासह इतर गुरुजनांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थीनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे, उपाध्यक्ष विश्वनाथ थळंगे, सदस्य शिवशरण प्याटी, रामेश्वर बिज्जरगी,प्रकाश दुधगी, मल्लिनाथ थळंगे, रमेश दुधगी, शंकर केशट्टी,संजय दुधगी यांच्यासह प्राचार्य विरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांनी अभिनंदन केले.तिच्या या यशाबद्दल प्रशालेतर्फे बुके व शैक्षणिक साहित्य देऊन तिला गौरविण्यात आले.
सदर परीक्षेच्या कामकाजासाठी परीक्षा विभाग प्रमुख बाळकृष्ण गुंड यांना कनिष्ठ लिपिक गौरीशंकर चनशेट्टी व सहशिक्षक बसवराज दुधगी यांचे सहकार्य लाभले आहे .ग्रामीण भागातून घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्याने साक्षी मल्लिकार्जुन भैरामडगी हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























