जेऊर – करमाळा तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या तथा माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना सामाजिक, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, प्रशासन यामध्ये एकात्मिक दृष्टिकोन ठेवून केलेल्या कार्यामुळे शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत २०२६ चा राज्यस्तरीय “शिवस्वराज्य पंढरीरत्न उत्कृष्ट महिला सरपंचरत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे. निवड पत्र अध्यक्ष श्री संदीप राजे मुटकुले पाटील यांनी दिले आहे
हा गौरवाचा सोहळा दिनांक १९/४/२०२६ रविवार रोजी योगभवन एलआयसी ऑफिस च्या पाठीमागे, गयामाता नगर पंढरपूर या ठिकाणी पार पडणार आहे या पुरस्कार समारंभाचे आयोजन शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या कडून आठवा वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले आहे. मा सरपंच सरवदे यांना ग्रामस्थ,सामाजिक संस्था पासून राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून प्रोत्साहन दिले जात आहे.


























