पिलीव – महाराष्ट्र शासनाकडून डिसीएस _ एम.एच. या अँपदवारे सध्या ई पिक पाहणी मोहीम सुरु आहे माञ तांत्रिक अडचणीमुळे याची माहीती ऑनलाईन होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे पिलीव परीसरातील शेतकरी ञस्त झाले आहेत. मोबाईल क्रमांक, गट क्रमांक न दिसणे तसेच जिपीएस लोकेशनचया ञुटीमुळे ही ऑनलाईन नोंदणी प्रक्रियाच वारंवार ठप्प होत आहे. यामध्ये ताबडतोब सुधारणा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. मोबाईलवर संपुर्ण माहीती भरल्यानंतर पिक पाहणी सेव्ह किंवा सबमिट न होणे यासह अनेक समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतात असुनही सदरच्या ॲपवर लोकेशन दुर असल्याचे दाखविले जात आहे. यामुळे नोंदणी करण्यात अडथळे येत आहेत. ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने पिकांची छायाचित्र अपलोड करताना अडचणी येत आहेत. ऑनलाईन माहीती सबमिट न झाल्यामुळे संपुर्ण प्रक्रियाच पुन्हा करावी लागत आहे.तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन पिक पाहणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना सदरची नोंदणी करता येत नसल्यामुळे प्रत्येक गावात दोन व्यक्तीची ऑनलाईन पिक पाहणी करण्यासाठी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे पण यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे ही ऑनलाईन पिक पाहणी खोळंबली आहे. शासनाने ताबडतोब या अँपमधील ञुटी दुर करुन ऑनलाईन पिक पाहणी व्यवस्थीत करण्याची मागणी कुसमोडचे सरपंच शहाजी लेंगरे यांनी केली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























