सोलापूर – शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पर जिल्ह्यातील एका आरोपीला अटक करून डोणगाव रोड वर शिंदे साठे नगरात झालेली दोन दिवसापूर्वी झालेली जबरी चोरी उघडकीस आणून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत .
शकिल उदाशा भोसले (वय २०, रा. कोळगाव, जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या त्या चोरट्याचे नाव आहे.
यातील फिर्यादीची आई इंदुमती साठे हया २९ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी घराच्या पोर्चमध्ये झोपले असता अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांचे तोंड दाबुन घातक हत्याराने गंभीर जखमी करुन गळ्यातील सोन्याचे मणी असलेली १० ग्रॅम वजनाची पोत जबरदस्तीने काढुन जबरी चोरी केली होती. त्याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना देवून तपास पथके रवाना केली. त्यानुसार स.पो.नि.शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकाने माहिती वरून पासपोर्ट ऑफिस गेटच्या बाजुला थांबलेल्या वरील आरोपीला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याचेजवळ ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोलाकार मणी व सोन्याचे २ जोड कर्णफुले मिळुन आले. तपासामध्ये त्याने व त्याचा साथीदार पक्ष्या काळे (रा. पुणे ) यांनी मिळुन वरील गुन्हा केल्याचे कबूल केले.
तसेच त्याचेकडे मिळुन आलेले दोन जोड कर्णफुले ३ महिन्यापुर्वी बेलाटी गावातील एका घरात मध्यरात्री त्याने स्वतः ,त्याचा साथीदार पक्ष्या काळे व पक्ष्या काळेचे दोन मित्र असे मिळुन घरात घुसुन घरातील लोकांना घातक हत्याराने मारहाण करुन दोन महिलांचे अंगावरील सोन्याचे कर्णफुले जबरदस्तीने काढुन घेतलेल्या दागिन्यापैकी कर्णफुले असल्याचे सांगितले. अशाप्रकारे सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास यश आले आहेत .
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार,, पोलीस उप – आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन , पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्वीनी पाटील , सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने , शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, जावेद जमादार, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, आबा साळवे, घिरज सातपुते, विठ्ठल यलमार महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले, चालक बाळु काळे व सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड, मच्छींद्र राठोड यांनी पार पाडली आहे.



























