बार्शी – लायन्स इंटरनॅशनल लायन्स क्लब बार्शी रॉयलतर्फे मोफत डायबेटिक चेक अप कॅम्पचे आयोजन डायबेटिक केअर सेंटर बार्शी हिरेमठ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तपासणी केली जाते. दि.३ ऑगस्ट रोजी डॉ. स्नेहल माढेकर, डॉ. निनाद माढेकर यांनी या शिबिरामध्ये २० पेशंटची तपासणी केली. या शिबिरामध्ये बीपी व शुगरची तपासणीचा कॅम्प हिरेमठ हॉस्पिटल या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत असतो. यावेळी प्रोजेक्ट चेअरमन डॉ. स्नेहल माढेकर, ला. कावेरी बागुल, ला. वैष्णवी जाधव, ला. उमेश जाधव, ला. दयानंद रेवडकर, ला.स्नेहल माढेकर, डॉ. निनाद माढेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. निनाद माढेकर यांनी रुग्णांची शुगर तपासणी करुन बदलत्या आहार जीवनशैली विषयी तसेच मधुमेहाविषयी माहिती दिली.
Post Views: 4