पंढरपूर – एज्युकेशन सोसायटीचे, कौशल्य विकास केंद्र ,पंढरपूर व युवाशक्ती फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर आणि तालुक्यातील होतकरू युवकांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे द.ह. कवठेकर विद्यालय (तालुका पोलीस स्टेशन मागे)मधील कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी शुक्रवारी (दि.१७) हा मेळावा सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत आयोजित करण्यात आला होता.
सुयोग्य निवड झालेल्या विविध शैक्षणिक विभागातील तरुण तरुणींना सुमारे १५ ते ३०हजार रुपये वेतनावर विविध कंपनी मध्ये घेण्यात आले. या मेळाव्यात २० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या मध्ये दोन हजारहून अधिक विविध पदे भरण्यात आली, यासाठी सर्व शाखेतील पदवीधर , दहावी, बारावी पास, नापास आय. टी.आय.(सर्व ट्रेड) डिप्लोमा इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल, सी एन सी ऑपरेटर, सी आयपि ईटी आदी शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी या मेळाव्याला आले होते.
यावेळी सुमारे शंभरच्या वर तरुण तरुणींना रोजगार विविध कंपनी मध्ये देण्यात आला. या मेळाव्याला पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुधीर पटवर्धन व युवाशक्ती फाउंडेशनचे रवी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मिटकॉन कंपनीचे प्रसाद तावसे, द.ह.कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम.कुलकर्णी व कौशल्य विकास केंद्रचे श्याम उत्पात यांनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले, या उपक्रमा बाबत संस्थेचे समाजाच्या विविध स्तरातून. कौतुक होत आहे.

























