सोलापूर – सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथील विचारक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आरोग्य शिबीर राबविण्यात आले होते. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीस व वैभव वाघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उदंड प्रतिसाद देत येथील नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. सोलापूर महानगरपालिका व दाराशा हॉस्पिटल येथील शेख मॅडम व त्यांच्या ४० कर्मचाऱ्यांनी प्रत्येकांची लक्षपूर्वक तपासणी करून त्यांना औषध गोळ्या देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक सुरज जगधने, सचिव राहुल शिवशरण, खजिनदार नागसेन बंगाळे, श्रद्धा लंकेश्वर, मनीष शिवशरण, रोहित दावणे, स्वप्नील कांबळे तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

























