Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता

तरुण भारतbyतरुण भारत
August 9, 2026
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : जयघोष, ढोल-ताशांचा निनाद, डॉल्बीचा दणदणाट, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित प्रबोधनात्मक देखाव्यांनी शहरातील वातावरण भारावून गेले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंती महोत्सवाची रविवारी दिमाखदार मिरवणुकीने सांगता झाली. विविध सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे हे मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. सुमारे ५५ मंडळांनी सहभाग घेतल्याने मिरवणुकीला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
        साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंती महोत्सवाला गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) सार्वजनिक मंडळांच्या वतीने प्रतिमेची मनोभावे प्रतिष्ठापना करून सुरुवात झाली होती. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने महोत्सवाची सांगता करण्यात आली.
येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रविवारी दुपारी दोन वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मिरवणुकीत शहरातील विविध भागांतील सुमारे ५५ मंडळांनी सहभाग नोंदविला. समाजबांधव, सामाजिक संस्था-संघटना, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणाईची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली. रात्री दहा वाजता मिरवणुकीचा समारोप झाला.
महापुरुषांच्या विचारांचा जागर
मिरवणुकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा जागर करणारे प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊंचे साहित्य, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गिरणी कामगारांचा संघर्ष, शिक्षणातून परिवर्तन आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देणाऱ्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
               डॉल्बीच्या चित्तथरारक आवाजासह रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने मिरवणुकीत विशेष रंग भरला.विविध गीतांवर तरुणाईने ठेका धरत उत्साहाला उधाण आणले. बुधवार पेठ, मातंग वस्ती, वीर फकीरा चौक, जुना बोरामणी नाका, लष्कर, विजापूर नाका, देगाव, पांढरी वस्ती, अशोक चौक, फॉरेस्ट यासह शहरातील विविध भागांतील मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
            साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून सुरू झालेली मिरवणूक रामलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चार हुतात्मा पुतळा, मेकॅनिकी चौक मार्गे येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली.
या देखाव्यांनी वेधले लक्ष
आर. के. प्रतिष्ठान : कोहिनूर मिल : लाल बावटा कलापथक यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गिरणी कामगारांच्या हक्काच्या संघर्षाचा देखावा सादर केला. वारणेचा वाघ युथ फाउंडेशन, पांढरे वस्ती यांनी ‘जग बदल घालुनी घाव – सांगूनी गेले मज भीमराव’ हा देखावा सादर केला. वीर फकीरा तरुण मंडळाने ‘संघर्षातून स्वाभिमान – शिक्षणातून परिवर्तन’ हा संदेश दिला.
एस. एस. ग्रुपने ‘एकजुटीच्या या रथावर आरूढ होऊनी चल बा पुढती…’ हा देखावा सादर करून सामाजिक एकजुटीचे महत्त्व स्पष्ट केले. सी. एस. मित्रपरिवारने महापुरुषांचा देखावा सादर केला. मधला मांगवाडा तालीम सावधान तरुण मंडळाने ‘मुंबई महाराष्ट्राचीच – संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हा देखावा सादर केला.
जय लहुजी युवा प्रतिष्ठानने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विविध ग्रंथसंपदेचा देखावा साकारला. नवरंग तरुण मंडळ, देगावने आकर्षक देखावा सादर केला, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाने ‘शाळेत नेतानाचा’ देखावा सादर केला. इतर मंडळांनीही लक्षवेधक व प्रबोधनात्मक देखावे सादर करून सामाजिक संदेश दिला.
मान्यवरांची उपस्थिती
मिरवणुकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष साक्षांत लोखंडे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, ॲड. शैलेश पोटफोडे, युवराज पवार, अजय मोहिते, बंडू गवळी, वैशाली डोलारे, मनोज लोंढे, महेश लोंढे, किशोर जाधव, प्रवीण वाडे, विशाल लोंढे, सतीश बगाडे, गोविंद कांबळे, विश्वास शिंदे, सुहास शिंदे, शांतीलाल साबळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना आणि इतर संघटनांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
———
Post Views: 95
Previous Post

ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

Next Post

संसदेत मोदीजींनी घेतले राहुल गांधींची फिरकी….. #viral #newsupdate

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संसदेत मोदीजींनी घेतले राहुल गांधींची फिरकी..... #viral #newsupdate

ताज्या बातम्या

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026
आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव — डॉ. वीरभद्र दंडे

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1163173

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!