
सोलापूर – शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवसेनेचे संपर्क प्रमुख खा. धैर्यशील माने हे सोलापूर दौऱ्यादरम्यान असताना शिवस्मारक, स्टँड चौक, निराळे वस्ती तसेच जय भोलेनाथ मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवरायांच्या पराक्रम, स्वराज्य आणि लोककल्याणकारी विचारांना वंदन करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच जय भोलेनाथ मंडळ, सोलापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श हेच आपल्या कार्याची प्रेरणा असून, त्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी निभावली पाहिजे.
यावेळी खासदार डॉ.ज्योती वाघमारे, नगरसेवक अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सपाटे, साईनाथ अभंगराव, अमर पाटील, मनीष काळजे, श्रीकांत गाडेकर, रवी गोणे, रियाज मुलानी, किरण पाटील, ब्रह्मदेव गायकवाड, शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.




















