टेंभुर्णी – श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचालित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सामूहिक गुरु प्रतिज्ञा घेण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरभाव कृतज्ञता भाव व्यक्त करीत आपले मनोगत सादर केले. तसेच जागीरदार या विद्यार्थ्याने सुरेख आवाजामध्ये गीत सादर करून उपस्थित पालकांना मंत्रमुग्ध केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रणिता कदम मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचे महात्म्य व गुरु-शिष यांचे नाते किती पवित्र असते याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेचे प्राचार्य विकास जी करळे सर यांनी एका सुंदर बोधकथेच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान किती महत्त्वाचे असते तसेच विद्यार्थ्याने संपादन केलेले यश हीच गुरुसाठी फार मोठी गुरूदक्षिण असते असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा सुरजाताई बोबडे, एस देवकर सर, प्राचार्य विकास करळे सर, पीआरओ सागर खुळे सर इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरांजली काळे प्रास्ताविक प्रिया गायकवाड तर आभार गायकवाड हिने व्यक्त केले.