पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे या भागातील पिके करपुन जाण्याच्या मार्गावर होती. माञ या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.या भागातील फळबागा, ऊस व इतर पिकांना चांगली उभारी मिळाली आहे.पिलीवसह, कुसमोड, झिंजेवस्ती, बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी, काळमवाडी या भागात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. सध्या सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी या गावात पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई जाणवत आहे. पिकांनबरोबरच, जनावरांना व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुळेवाडी, बचेरी ,शिंगोर्णी गावात अद्यापही थोडाफार दिलासा मिळाला असला तरीही अजुन दमदार पावसाची अपेक्षा आहे.या पावसामुळे प्रचंड उष्णता व उकाडयाचा सामना करणाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असून तापमानात बदल झाला आहे.मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या परीसरात खरीप पेरण्यांनां वेग येणयाची शकयता आहे .सध्या तरी या भागात पोषक वातावरण तयार झाले असुन या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरीही अजुन एक _ दोन दमदार पावसाची अपेक्षा असुन या भागातील ओढे, नाले ,बंधारे तुडुंब भरल्याशिवाय पाण्याची पातळी वाढणार नाही .काल झालेल्या पावसामुळे पाणी वाहीले माञ पहीलाच पाऊस असल्यामुळे पाणी आटुन गेले.माञ या पावसामुळे दिलासा मिळाला आहे .यावेळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट दिसत होता यामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता .तो दुसऱ्या दिवशी दुपारी पूर्ववत झाला .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















