मोहोळ – सावळेश्वर येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जुन्या अरुंद पुलावर झालेल्या भीषण अपघातात मुलाचा मृत्यू तर वडील जखमी झाले.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास दिंगबर टेकाळे (वय४० ) यांनी याची फिर्याद दिली त्यानुसार यात मयत प्रशांत टेकाळे वय 25 हा तरुण आपल्या वडिलांसोबत MH 13 BM 4199 दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना दर्ग्या नजीक असलेल्या पुलावर TSO8UB. 4244 क्रमांकाच्या कंटेनरने जोराची धडक दिली. त्यामुळे मागे बसलेला प्रशांत खाली पडला आणि
त्यावेळी मोटार सायकल रोडच्या कडेला पडली . मृत प्रशांत टेकाळे कंटेनर खाली चिरडून पायाला व डोक्याला मार लागून कंटेनरच्या डाव्या बाजूचे चाक जाऊन गंभीर जखमी होऊन मालट्रक कंटेनरखाली पडला. तर वडील गंभीर जखमी झाले .या ट्रक चा ड्रायव्हर महादेव बाबुराव रा . मेन रोड, हुनसगेरा ता . हुमनाबाद जि. बिदर (कर्नाटक) असे असल्याचे समजते.
अपघातात सावळेश्वरमधील तरुण मरण पावल्याने येथील तरुणांनी जवळजवळ दीड एक तास वाहतूक बंद केली होती . त्यामुळे दोन्ही बाजूने जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . रस्त्याचे काम सुरु केल्याशिवाय वाहतुक सुरु होऊ द्यायची नाही ; असा पवित्राया सर्वांती घेतला परंतु वरिष्ठांच्या विनंतीनुसार रस्त्याचे काम सुरू झाले व वाहतुक पूर्ववत करण्यात आली .यावेळी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मोहोळचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील,राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अधिकारी स्वप्निल कासार, अवसून रेड्डी, व कर्मचारी उपस्थित होते .
चौकट .
या रस्त्याबाबत दि . १० जुलै रोजी आंदोलन केले होते . येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काकडे यांनी या अरुंद पूल व सर्व्हिस रस्त्याबाबत NHAI कार्यालयासमोर आंदोलन केले होते .
चौकट . .
सावळेश्वर येथील रस्त्यावर सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर असलेला अरुंद पूल वाहतुकीस अडथळा ठरत आहे. या परिसरालगत उजनी वसाहत असल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व कामगार यांची सतत ये-जा सुरू असते.
*फोटोओळ . . ( सावळेश्वर ता . मोहोळ ) येथे सोलापूर – पुणे महामार्ग एक तास बंद करतेवेळी आंदोलनकर्ते दिसत आहेत*.
Post Views: 9