सांगोला – एआयमुळे जग झपाट्याने बदलत आहे. आजच्या काळात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांकडे ज्ञान, तंत्रज्ञानाची समज, नवीन कल्पना आणि प्रभावी संवादकौशल्य असणे आवश्यक आहे असे मत संस्थेचे सचिव डॉ.अमित रूपनर यांनी व्यक्त केले. फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. चार वर्षांचा इंजिनिअरिंगचा प्रवास आनंदाने, आत्मविश्वासाने आणि ज्ञानसमृद्ध पद्धतीने पूर्ण करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, डॉ.अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर, प्रा.प्राजक्ता रूपनर तसेच वक्ते विक्रांत बेले यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विक्रांत बेले यांनी पहिल्या वर्षाचा ताण स्वाभाविक आहे, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचारांनी आपण त्याचा सामना केला पाहिजे असे व्याख्यानातुन सांगितले. याप्रसंगी भाऊसाहेब रूपनर, डॉ.संजय आदाटे, डॉ.रविंद्र शेंडगे, डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्योती शिंदे, सूत्रसंचालन प्रा.सत्यशील कोळेकर व प्रा.हरिदास पवार, आभार प्रदर्शन प्रा.भारती गायकवाड, यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.