Friday, May 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघात महायुती अन् मविआत टक्कर, कोण ठरणार वरचढ ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 29, 2023
in political
0
महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघात महायुती अन् मविआत टक्कर, कोण ठरणार वरचढ ?
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ असून राज्यातील मतदार कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. २०१९ पासून घडलेल्या घडामोडींचा राज्याच्या राजकारणावर परिणाम दिसून येऊ शकतो.

 

 

२०२४ ची लोकसभा निवडणूक देशाच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणार आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात मविआ आणि महायुतीत टक्कर होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीय. त्यामुळं राज्यातील लोकसभा निवडणुकीची गणित बदलली आहेत.

 

भाजपला कशाची चिंता सतावतेय?

भाजपला शहरी भागात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. तर, ग्रामीण भागात भाजपला कशी कामगिरी असेल याची चिंता आहे. राज्यातील कृषी क्षेत्रावर संकट आहे. अवकाळी पाऊस आणि कृषी मालाचे पडलेले दर यांनी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, कांदा दर पडल्यानं शेतकरी सातत्यानं संकटात सापडले आहेत. शेतमालाच्या निर्यातीवर बंदी आणि शुल्क लादल्यानं शेतकरी अडचणींचा सामना करत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा संताप विकसित भारत यात्रेला होणाऱ्या विरोधाच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका भाजपला बसण्याची भीती आहे.

 

 

शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट

शिवसेनेत जून २०२२ मध्ये फूट पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ ला फूट पडली आहे. यामुळं राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्षांची ताकद विभागली गेलीय. राष्ट्रवादीनं गेल्या वेळी राज्यात चार जागांवर विजय मिळवला होता. यावेळी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर, शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळं गेल्या वेळी १८ जागा जिंकणारा पक्ष किती जागा जिंकणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

 

 

३२ ते ३५ जागांवर भाजप लढणार?

एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे. मात्र, गेल्या वेळेस जिंकलेल्या १८ जागा ते पुन्हा जिंकू शकणार का हा प्रश्न आहे. आमदार आणि खासदार जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तर शिवसेनेचे केडर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं बोललं जातं. त्यामुळं भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या काही खासदारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी देऊ शकतं. राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजप ३२ ते ३५ जागा लढवण्याची शक्यता आहे.

 

 

काँग्रेसची स्थिती सुधारणार?

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला होता. काँग्रेसला २०१४ ला दोन जागांवर तर २०१९ ला एका जागेवर विजय मिळाला होता. मात्र, यावेळी काँग्रेसची स्थिती सुधारण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघात भाजपचा २८ वर्षांचा बालेकिल्ला काँग्रेसनं ताब्यात घेतला होता. महाविकास आघाडीत आता वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. मविआच्या एकत्रित ताकदीचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

Post Views: 91
Previous Post

मराठा आरक्षण, शरद पवार-अदानी भेट ते निवडणुका, खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात

Next Post

रोहित शर्माने कोणाच्या डोक्यावर फोडले भारताच्या पराभवाचे खापर? सामन्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रोहित शर्माने कोणाच्या डोक्यावर फोडले भारताच्या पराभवाचे खापर? सामन्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य

रोहित शर्माने कोणाच्या डोक्यावर फोडले भारताच्या पराभवाचे खापर? सामन्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

अश्विनी तडवळकर यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा कला गौरव रत्न जाहीर #solapurnews #marathinews

May 21, 2026

आशा वर्करला आहे मदतीची आशा

May 21, 2026

मानेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच गावातील अनेक तरुण उच्च पदस्थ अधिकारी!

May 21, 2026
अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

May 21, 2026

सोलापूरचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी स्वीकारला पदभार

May 21, 2026
महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

May 21, 2026

एम.पी.एस.सी. मोठा निर्णय; टायपिंग टेस्ट रद्द, गुणवत्तेच्या जोरावरच मिळणार सरकारी नोकरी

May 21, 2026
बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

May 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0874372

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697