सोलापूर : अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षण आरक्षण व संरक्षणाबाबत योग्य ते कृती कार्यक्रम शासनामार्फत आखण्याच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने सोलापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आंदोलनात विचारमंचचे शहराध्यक्ष शौकत पठाण जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल, इरफान महाजन, बाबू पटेल, गौस तांबोळी, डॉक्टर ए एम शेख, कोमारोह सय्यद, समिअल्लाह शेख, सर्फराज अहमद, राजा बागवान, जमीर शेख, शोहेब चौधरी, सल्लाउद्दीन शेख, निसार शेख, मुस्ताक लालकोट, जावेद पटेल यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.