बार्शी – श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली शाहिस्ते खानाची फजिती” या भव्य आणि जिवंत देखाव्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत व बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार सौ.वर्षाताई झाडबुके-ठोंबरे यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाने यंदा अतिशय प्रेरणादायी देखावा साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची केलेली फजिती हा इतिहासातील शौर्याचा आणि युक्तीचा सर्वात मोठा प्रसंग आहे. आजच्या तरुणपिढीला आपल्या राजांचा इतिहास कळावा, त्यांच्यात शिवविचार रुजावा, या हेतूने हा देखावा उभारला आहे. मंडळातील सर्व तरुणांचे मी मनापासून अभिनंदन करतो. अशा देखाव्यांमधूनच आपला खरा इतिहास जिवंत राहतो.
श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्यावतीने जाहीर आवाहन करण्यात आले की, आमच्या मंडळातर्फे यंदा ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली शाहिस्ते खानाची फजिती’ हा भव्य जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. बार्शीतील सर्व गणेशभक्तांनी, शिवप्रेमींनी आणि नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या देखाव्याला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या वैभवशाली इतिहासाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजनभाऊ जाधव, युवा नेते अक्षयआण्णा जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समितीचे उपसभापती संतोषदादा निंबाळकर, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, याराना ग्रुपचे अध्यक्ष गणेश नान्नजकर, महेश यादव, अमोल वायचळ, प्रशांत कथले, दिपक रोंगे, बाबासाहेब कापसे, उपसभापती बाबा गायकवाड, विलास रेणके, गणेश चिकणे, येडशीचे उद्योजक गजानन नलवडे, श्रीमंत थोरात, कौरव माने, तुळशीदास मस्के, भैय्या बारंगुळे, आण्णा घोंगाणे, रविंद्र राऊत, उमाकांत राऊत, विजय राऊत, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप गांधी, महेश बाफणा, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, अमोल चव्हाण, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, लखन राजपूत तसेच आजी-माजी नगरसेवक, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 15