सोलापूर : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख (मालक) व आमदार देवेंद्र कोठे यांना निमंत्रण देण्यात आले. हे निवेदन महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने सादर करण्यात आले.
महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील 200 पेक्षा अधिक मंडळांच्या सहभागातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ होणार असून संबंधित मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती राहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महामंडळाचे सचिव रॉकी बंगाळे, नगरसेवक अमर पुदाले, एस. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर, भीमा मस्के तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

























