पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जयसिंग मल्हारी धायगुडे यांनी अज्ञात कारणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे ते 61 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,दोन मुली, सुना नातवंडे ,एक बंधु , भावजय असा परिवार आहे . या घटनेची माहीती मिळताच पिलीव पोलीस ठाण्याचे हवालदार शंकर मरळे व नितीन लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला .त्यानंतर त्यांचा त्यांच्या पार्थिवाचे माळशिरस तालुक्याचे पोलीस उपाधीक्षक विशाल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शंकर मरळे व नितीन लोखंडे यांनी रीतसर पंचनामा करून माळशिरस येथे शवविच्छदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .राञी उशीरा कुसमोड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोपाळराव घोळवे करीत आहेत.
Post Views: 9